नाशिक: अँटिलिया समोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. पोलीस दलात फेरबदल केल्यानंतरही ही टीका थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही सरकारची बाजू मांडत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी आज या प्रकरणावर प्रथमच भाष्य केलं.

वाचा:

येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सचिन वाझे यांच्यावर कारवाई झालेली आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) देखील अधिक तपास करत आहे. काही अधिकारी चुकीचे वागले तरी सगळे बदनाम होतात. त्यामुळं तपास पूर्ण होऊ द्या,’ असं ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात घडलेल्या तेलगी मुद्रांक प्रकरणाचाही दाखला दिला. ‘तेलगी प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांचंही नाव आलं होतं. त्यामुळं त्यांची मोठी बदनामी झाली. मात्र, ते निर्दोष होते हे कालांतरानं सिद्ध झालं,’ असं भुजबळ म्हणाले.

लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले भुजबळ?

‘राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. नाशिकमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. लॉकडाऊन नको असेल तर बंधनं पाळायला हवीत. नाहीतर सरकारचा नाईलाज होईल. कोविड बरा होतो मात्र काहींना कायमचं दुखणं देतो. खाजगी हॉस्पिटल आणि खासगी लॅबनी आपल्या रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणांना देणं आवश्यक आहे,’ असं ते म्हणाले.

वाचा:

‘सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जातोय. व्यापारी पेठा आणि भाजी मार्केटमध्ये मोठा गैरफायदा घेतला जातोय. कारवाई केली तर फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते,’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘आपण कोणती व्हॅक्सीन घेतली याची माहिती लस घेणाऱ्यानं ठेवायलाच हवी. २८ दिवसांनंतर, पुन्हा तोच डोस पुन्हा घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here