वाचा:
मुंबईत बुधवारी तब्बल २३७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, आठ जणांचा मृत्यू झाला. सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्समध्ये १५५० बेड आहेत. मात्र, ते सगळे भरले आहेत. इतर रुग्ण प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. मात्र, करोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे आज सेव्हन हिल्स रुग्णालयाला भेट देणार आहेत.
मुंबईत रात्रीच्या संचारबंदीची शक्यता
मुंबईत सातत्यानं वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं निर्बंध अधिक कठोर करण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईतील गर्दीच्या बाजारपेठा इतरत्र हलवण्यात येणार असून रात्रीची संचारबंदी लावण्याचा गांभीर्यानं विचार सुरू आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
वाचा:
राज्यात बुधवारी २३ हजार १७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राज्यभरात ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या ३ लाख ४९ हजार ९७४ इतकी झाली आहे. तर, करोनामुळं आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ५५१ इतकी आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times