मुंबईः देशभरातील सर्व टोलनाके एका वर्षात हटवले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या या घोषणनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आलं आहे. मनसेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. नितीन गडकरींच्या घोषणेनंतर मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर पेजवर यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

गेल्या अनेक वर्षभरात मनसेनं टोलबंदसाठी अनेक आंदोलनं केली होती. त्यानंतर आज नितीन गडकरी यांनी ही घोषणा केल्यानंतर मनसेनंही एक ट्वीट केलं आहे. आम्ही अनावश्यक, अनधिकृत टोलबाबत आंदोलनं केली, ६० हून अधिक टोलनाके बंद झाले. त्यानंतर राजसाहेबांनी २०१४ साली, विकास अराखड्यात हीच कल्पना मांडली होती, असं ट्वीट मनसेनं केलं आहे. सोबतच, राज ठाकरेंच्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओही ट्वीट केलाय.

व्हिडिओत काय म्हटलंय?

‘मी पहिल्यापासून भूमिका मांडली होती माझा टोलला विरोध नाही पण टोलमधून आलेल्या पैशा जातोय कुठे, त्या पैशाचं होतंय काय?, तो संपूर्ण पैसा हा रोख रक्कमेवर होतो. तुम्ही तिथे कॅश देता, नोट देता त्यामुळं तिथं किती काम झालंय, किती पैसे आले, किती गाड्या आल्या याचा कोणालाही थांगपत्ता नसतो.’

‘त्यामुळं आम्ही एक सिस्टिमबद्दलचा विचार मांडलाय. जर टोल भरायचा असेल तर टोलनाक्यावर फक्त तुम्हाला पावती द्यायची असेल तुम्ही आगोदरच त्या टोलचे पैसे भरलेले असतील ते सरकारी खात्यात जमा होती. पण ते कोणत्याही खासगी माणसांच्या खिशात जाणार नाहीत. आणि संपूर्ण टोलवरचा सगळा कारभार कॅशने बंद होईल.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here