जळगाव: भारतीय जनता पक्षाला धक्का देऊन महाविकास आघाडीनं महापालिकेची सत्ता खेचून आणली आहे. जळगावात शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. जळगावत सत्ता परिवर्तनाची रणनीती कशी आखली गेली, हेही खडसे यांनी उघड केलं आहे. ( on BJP Defeat in )

जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. पण भाजपकडून जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था झाली होती. पाण्याची समस्या होती. नागरिकांबरोबरच नगरसेवकही नाराज होते. त्या नाराजीतून नगरसेवक स्वत:हून आमच्याकडं आले आणि सत्ता परिवर्तन सोपं झालं,’ असं खडसे म्हणाले.

वाचा:

‘दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एका विषयावर चर्चा करत असताना जळगावचा विषय निघाला. जळगावात तुम्ही लक्ष घालावं, अशी विनंती मी त्यांना केली. त्या चर्चेवेळी निवडणुकीचा विषय निघाला. शिवसेनेनं महापौरपदासाठी उमेदवार दिला तर मी मदत करेन, असा शब्द मी त्यांना दिला. नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्यांना आवाहन केलं तरी ते जमू शकतात. आजच २२ नगरसेवक आमच्यासोबत आहेत, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत आणि माझी चर्चा झाली. त्यातून शिवसेनेचा महापौर करावा असं ठरलं. त्यासाठी भाजपच्या नाराज नगरसेवकांना फारसा आग्रह करावा लागला नाही. अनेक नगरसेवक महिना, दीड महिन्यांपासून माझ्याकडं फेऱ्या मारत होते. सुनील खडके, सुनील महाजन वगैरे भेटून गेले होते. या सगळ्या भेटीगाठीतून हा प्लान ठरला. कोणालाही त्याची कल्पना नव्हती. ठरल्यानुसार सर्व पार पडलं. खुद्द गुलाबराव पाटलांना (Gulabrao Patil) पाच दिवसांपूर्वी याची कल्पना दिली गेली. त्यानंतर त्यांनी नाराज नगरसेवकांची व्यवस्था केली,’ असं खडसे म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

गिरीश महाजनांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी होती!

खडसे यांनी या निमित्तानं गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीकेची संधी साधली. ‘भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये एक अहंपणा, गर्विष्टपणा आहे. गिरीश महाजनांची वर्तणूक, त्यांच्या वागण्याविषयी देखील नगरसेवकांमध्ये नाराजी होती. नगरसेवकांना तुच्छ लेखणं. दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं हे सगळं सुरू होतं. त्याचा परिणाम असा झाला की नगरसेवक स्वत:हून आमच्याकडं आले,’ असं खडसे म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here