भाजपने ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यत: पोलिस दलातील फेरबदलानंतर भाजपने हे टीकास्त्र सोडले आहे. फेरबदल म्हणजे पोलिसांवरील दबाव असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. मुंबई पोलिस यांचं जगात नाव आहे, अशा पोलिस दलावर आता जेवढा दबाव आहे तेवढा दबाव कधीही आला नसेल, असं भाजपनं म्हटलंय. इतकंच नाही तर, ठाकरे सरकारचा उल्लेख हुकुमशाही ठाकरे सरकार असा करत, अशा सरकारच्या दबावात मुंबई पोलिसांना नको की कामं करावी लागत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. हे सरकार पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं काम करतंय. तसंच अनेक प्रकरणं हे सरकार दाबण्याचं पाप करत असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.
भाजपने ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जात आहे.’
क्लिक करा आणि वाचा- गृहमंत्र्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती
या बरोबरच भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सचिन वाझे यांची नेमणूक तुम्ही चालवून घेतलीत, मग आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही, असे सांगितल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली का?, मनसुख हिरण यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझे यांच्यावर काहीच कारवाई कशी झाली नाही?… NIA ची चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे तुम्हाला आदेश होते का?… इतके भयंकर कट रचणाऱ्याच्याच हाती तपास कसा काय दिला गेला?… चोराच्या हाती चाव्या देण्याइतके आपण
मजबूर का झालात गृहमंत्री?, असे अनेक प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times