एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी दुपारी ही दुसरी मर्सिडीज गाडी जप्त केली. ही गाडी जप्त करून एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली. सध्या या गाडीची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
सचिन वाझे प्रकरणात एनआयएने सर्वप्रथम स्कॉर्पिओ जप्त केली होती. त्यानंतर इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली. इनोव्हा जप्त केल्यानंतर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली.
सचिन वाझे यांची चौकशी केल्यानंतर एनआयएने सीएमटीएमजवळील एका पार्किंगमधून पहिली मर्सिडीज ताब्यात घेतली. त्यानंतर आज दुसरी मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली आहे. आता यातून आणखी कोणती महत्त्वाची माहिती समोर येते आणि त्यानंतर कोणाला अटक होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
एनआयएने ताब्यात घेतलेल्या पहिल्या मर्सिडीजमधून केरोसीनसह ५ लाख रुपये रोख, तसेच एक पैसे मोजण्याचे मशीन सापडले होते. तसेच या गाडीत एक शर्ट देखील सापडले होते.
क्लिक करा आणि वाचा-
आज जप्त करण्यात आलेल्या दुसऱ्या मर्सिडीजच्या तपासणीनंतर आणखी महत्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गाडीत कोणत्या वस्तू सापडतात हे देखील महत्वाचे असणार आहे. मात्र ही मर्सिडीज कोण वापरत होते?, ही गाडी सचिन वाझे तर वापरत नव्हते?, या गाडीचा खरा मालक कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे अतिशय महत्वाची ठरणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times