महापालिकेने मध्यरात्रीनंतर १ वाजता केली कारवाई
महानगरपालिकेच्या पथकाने रात्री १ वाजताच्या सुमारास ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी तब्बल २४५ लोक मास्क न घालताच असलेले आढळून आले. पालिकेने या २४५ लोकांवर विना मास्क विषयक कारवाई केली. तसेच सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर देखील नोंदवलेला आहे. अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार महापालिकेने बंद केला आहे. तसेच रात्री २४५ लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मुंबईत करोनाची स्थिती
राज्यासह मुंबईत मुंबईत देखील बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल बुधवारी मुंबईत एकूण २ हजार ३७७ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले. मुंबईत दिवसभरात एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १४५ दिवसांपर्यंत खाली आला आहे. या बरोबरच मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर देखील घसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईत करोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९२ टक्के इतका आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत एकूण करोना रुग्णांची संख्या ३ लाख ४९ हजार ९७४ वर पोहोचली आहे. मुंबईतील एकूण मृतांची संख्या ११ हजार ५५१ वर गेली आहे. मुंबईत काल दिवसभरात ८७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, मुंबईत आतापर्यंत एकूण ३ लाख २२ हजार १०७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ९२ टक्के इतरे आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times