म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

माजी केंद्रीय मंत्री यांच्यावर आज सायंकाळी अहमदनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तीन वेळा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असूनही अंत्यसंस्कार शासकीय इतमामात का झाले नाहीत आणि पोलिसांनी सलामीही का दिली नाही, यावरून आता नवा वाद उपस्थित झाला आहे. गांधी यांच्या कन्या स्मिता अवसारीकर यांनी तेथेच यावरून संताप व्यक्त केला. उपस्थित पोलिसांनी यासंबंधी आपल्याला काहीही सूचना आलेल्या नसल्याचे त्यांना सांगितले.

गांधी यांचे बुधवारी पहाटे दिल्लीत करोनामुळे निधन झाले. मात्र, त्यांच्यावर कर्मभूमी नगरमध्येच अंत्यसंस्कार व्हावेत, असा अग्रह धरण्यात आला. त्यामुळे विशेष परवानगी घेऊन त्यांचे पार्थिव रस्तेमार्गे नगरला आणण्यात आले. दुपारी चार वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. शहरात ठिकठिकाणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सायंकाळी अमरधामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोजक्याच लोकांना अमरधाममध्ये प्रवेश देण्यात आला. खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

पोलिस आणि सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते तहसिलदार उमेश पाटील आणि उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, अंत्यसंस्कार सरकारी इतमात का केले नाहीत? पोलिसांनी सलामी का दिली नाही, असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. गांधी यांच्या कन्या नवसारीकर यांनी यावरून अधिकाऱ्यांच धारेवर धरले. तीन वेळा खासदार, एकदा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आपल्या वडिलांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार का केले नाहीत? यात कोणी राजकारण आणत आहे का? असा सवाल करून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. मात्र, यासंबंधी वरिष्ठस्तरावरून आपल्या काहीही सूचना आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते अनिल राठोड यांचेही करोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते, यी आठवण कार्यकर्त्यांनी करून दिली. गांधी यांच्याबाबतीत हा नियम का डावलण्यात आला, असा प्रश्नही कार्यकर्ते उपस्थित करीत होते.

क्लिक करा आणि वाचा-
राठोड यांच्या निधनानंतर शहरात होणाऱ्या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी सुरू झाली होती. आता यासाठी गांधी यांचेही नाव पुढे केले जाऊ लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here