‘आजकाल महिला फाटलेली जीन्स वापरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिलांच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून वाटतं की यामुळं समाजात काय संदेश जाईल? मुलांवर कसे संस्कार होतील? हे सर्वस्वी पालकांवर असतं. स्वयंसेवी संस्थेत काम करणारी महिला असे कपडे परिधान करत असेल तर त्या समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवतील? अशी टिप्पणी तीरथसिंह रावत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. उर्मिला मातोंडकर यांनीही यांच्यावर निशाणा साधला आहे.
फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, असा खोचक टोला उर्मिला यांनी लगावला आहे. सोबतच #RippedJeansTwitter असा हॅशटॅगही सोबत जोडला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनंदेखील तीरथसिंह यांना फटकारलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्वीट
समाजासाठी सगळ्यात जास्त हानिकारक काय आहे. फाटलेली जीन्स की असे विचार, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times