म.टा. प्रतिनिधी,

एका कामासाठी चौदा लाख रुपये उधार दिल्याच्या प्रकरणात विनोद चौधरी आणि त्यांच्या एका साथिदारावर दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेत. ( order to file a against the in )

राजा शरिफ असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी राजा शरिफ यांचे वकील अॅड. आशिष कटारिया यांच्यामार्फत त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जानुसार, २०१९मध्ये शरिफने या प्रकरणातील अन्य आरोपी अशफाक अली याला काही कामासाठी १४ लाख रुपये उधार दिले. त्याचे पुरावेसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा त्याने आपल्यात अर्जात केला आहे. उधार दिलेले १४ लाख रुपये परत करण्यास अली टाळाटाळ करीत होता. शरिफने त्याला पैशांसाठी अनेकदा फोन केले. मात्र त्याने पैसे परत केले नाहीत.

अलीने चौधरींना संपर्क साधला. चौधरी हे तेव्हा गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पोलिस निरीक्षक होते. चौधरींनी शरिफला फोन करून त्याला बोलावून घेतले. शरिफ पोहचला तेव्हा अली तेथे चौधरींसह उपस्थित होते. या दोघांनी आपल्याला मारहाण केली व आपल्याकडी सोन्याचे ब्रेसलेटसुद्धा हिसकावल्याचा आरोप शरिफने केला आहे. तसेच अलीकडून पैसे न घेण्याची धमकीही दिली.

क्लिक करा आणि वाचा-

पोलिसांनी शरिफ यांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे शरिफ यांचे म्हणणे आहे. आपली तक्रार नोंदवून न घेतल्याने शरिफने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. व्ही. एम. देशमुख यांनी याप्रकरणी पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व अशफाक अलीवर मारहाण, धमकी देणे व खंडणीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश लकडगंज पोलिसांना दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here