सचिन वाझे यांना पोलिस दलात घेण्यासाठी शिवसेनेने आग्रह केला ही गोष्ट कपोलकल्पित असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणतात की त्यांनी यांनी सचिन वाझे यांच्याबाबत अॅडव्होकेट जनरल यांचे मत घेतले. मात्र त्यांनी हे मत कधी लेखी मागितले? आणि अॅडव्होकेट जनरल यांनी ते मत कधी लेखी दिले, हे फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हानच अनिल परब यांनी फडणवीस यांना दिले आहे.
‘कोणाचीही चौकशी करावी’
सचिन वाझे प्रकरणी कोणाचीही चौकशी करावी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काही घाबरुन कोणती चौकशी करु नये, अशी विनंती करत नाही, असे परब म्हणाले. कोणतीही चौकशी करण्यासाठी यंत्रणा स्वतंत्र आहे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असेही परब पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
उद्धव ठाकरेंचेही घेतले नाव
निलंबित असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना परत सेवेत घ्यावे अशी विनंती शिवसेनेने आपण मुख्यमंत्री असताना आपल्याला केल्याचे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी यांचे नाव घेतले. आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times