आज गुरुवारी मेळघाटात पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी विजाही कोसळल्या. जंगल, अभयारण्यातून धो-धो पाऊस बरसला. धारणी आणि चिखलदऱ्याच्या अतिदुर्गम भागात आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठी मशागत केल्यानंतर पठारावर पेरलेली पीके या वादळी पावसामुळे नेस्तनाबूत झाली आहेत.
बैरागड, रंगुबेली, कूटंगा, चौराकूंड, रायपूर, हतरु, रुईपठार, ऐकताई, बीबा, जारीदा, काटकूंभ, चूर्णी, घंटाग, टेब्रूसोडा, जामली, कालापांढरी, चिखली, हरिसाल, ढाकणा, बिजूधावडी, सुसर्दा, राणीगाव, सावलीखेडा, साद्राबाडी, कळमखार सारख्या महसूल मंडळांतर्गत वसलेल्या शेकडो खेड्यापाड्यात या वादळी पावसाने कहर केला आहे. या भागातील गहू ,हरभरा आणि उन्हाळी मूग आणि उन्हाळी मका नष्ट झाला.
क्लिक करा आणि वाचा-
त्याच प्रमाणे बहरलेला आंब्याचा मोहोर देखील पावसाच्या माऱ्यामुळे गळून गेला आहे. आजच्या अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times