मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या दोन दिवासांपासून रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र आहे. राज्यात बुधवारी २३ हजार १७९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर गुरुवारी २५ हजार ८३३ रुग्णवाढीसह आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. यांनी या बैठकीत महत्त्वाची माहिती दिली. ( )

वाचा:

डॉ. प्रदीप व्यास यांनी गेल्यावर्षीच्या सर्वोच्च आकडेवारीशी तुलना करत नव्याने वाढत असलेल्या संसर्गाचे गांभीर्य अधोरेखित केले. १७ सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा उच्चांकी संख्या परत गाठली गेली असून अशीच वाढती संख्या राहिल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोनाचे ३ लाख सक्रिय रुग्ण राज्यात होऊ शकतात, असे व्यास यांनी सांगितले. ही स्थिती लक्षात घेता सर्वांनी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपण दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढवत आहोत. बुधवारी दिवसाला २ लाख ७५ हजार डोस देण्यात आले. लवकरच आपण ३ लाख डोस दरदिवशी देऊ शकू. प्राधान्य गटात १.७७ कोटी जणांना दोन डोस म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात ३.५ कोटी डोसची आवश्यकता आहे. अजून साधारणपणे ३ कोटी डोस द्यायचे आहेत. वेग वाढल्यानंतर ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होऊ शकेल, असा विश्वासही व्यास यांनी व्यक्त केला.

वाचा:

कोविड लसीकरणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

कोविड लसीकरणात १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आतापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३ हजार ४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान ३६ लाख ८४ हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे, असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते. बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे, असे सांगितले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवसाला ३ लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

वाचा:

लस वाया जाऊ देऊ नका

बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाची सूचना केली. महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणांमुळे वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते आहे मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६ टक्के आहे, ते देखील शून्यावर आले पाहिजे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांप्रमाणेच लसीकरण झाले पाहिजे हे पाहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संसर्ग असो किंवा लसीकरण, दोघांच्या बाबतीत अधिक मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जनजागृती करावी असे सांगितले. राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ २ हजार नवे रुग्ण आढळत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यादृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसेच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचे नियोजन करा, अशी सूचना टोपे यांनी दिली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई पालिका आयुक्त आय. एस. चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते. या सदस्यांनी यावेळी लसीकरण वाढविण्यासाठी विविध सूचना केल्या.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here