मुंबई: पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समाजाबाबतच्या (sharjeel usmani) याच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शर्जील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशा शब्दांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे प्रहार केले आहेत. ( criticizes and in the context with )

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख महाभकास आघाडी असा केला. पाटील आपल्या एका ट्विटमध्ये म्हणतात, शर्जीलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शर्जील उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे.

पाटील यांनी आपल्या पुढील ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा चेहरा दुतोंडी आणि हिंदुविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात, ‘या लबाड सरकारने शर्जील उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास भविष्यात भाजप याहूनही तीव्र आंदोलन करेल, हिंदूंचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही’

क्लिक करा आणि वाचा-

‘ यांच्या निष्क्रियपणामुळे शर्जीलला अद्याप अटक नाही’

चंद्रकांत पाटील यांनी आणखी एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निष्क्रिय असे म्हटले आहे. हिंदुसमाजाबद्दल विखारी वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीच्या अटकेसाठी आज राज्यात विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. अशी माहिती देताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शर्जीलच्या मुसक्या आवळून आणणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छातीठोकपणे होते. मात्र असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियपणामुळे शर्जीलला अद्याप अटक करण्यात आली नाही , असे पाटील यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here