मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत २५ हजार ८३३ नवीन रुग्णांसह आजवरचा उच्चांक नोंदवला गेला असताना मुंबईतही रुग्णसंख्येत आज उच्चांकी वाढ झाली आहे. मुंबईत आज तब्बल २ हजार ८७७ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १८ हजार ४२४ इतकी झाली आहे. दरम्यान, एका दिवसातील आजवरची मुंबईतील ही सर्वोच्च रुग्णवाढ ठरली असून गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत २४ तासांत २ हजार ८४८ रुग्णांची नोंद झाली होती. ( )

वाचा:

मुंबईतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेले काही दिवस सातत्याने दररोज २ हजारावर नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यात , , या करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांतही दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आज पालिकेने दिलेली आकडेवारी पाहिल्यास २४ तासांत मुंबईत करोनाचे २ हजार ८७७ रुग्ण वाढले आहेत तर १ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ४२४ इतकी झाली आहे. आज करोनाने आणखी ८ रुग्ण दगावले असून आतापर्यंत मुंबईत या साथीने ११ हजार ५५५ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईत आजवर ३ लाख ५२ हजार ८३५ जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील ३ लाख २१ हजार ९४७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर १३६ दिवस इतका आहे.

वाचा:

दादर, माहीम, धारावीत रुग्ण वाढताहेत

गेल्यावर्षी करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, दादर, माहीम भागात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले असून गेल्या २४ तासांत या भागात १०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दादरमध्ये आज ४१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २४३ इतकी झाली आहे. माहीममध्ये आज ३१ रुग्ण आढळले असून सध्या २९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर धारावीत ३० रुग्णांची वाढ झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १४० वर पोहचली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here