मुंबई: राज्यात संसर्गाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत असून आज तब्बल २५ हजार ८३३ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील करोना रुग्णसंख्येचा हा आजवरचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा दोन लाखाच्या दिशेने सरकू लागला आहे. आजच्या नोंदीनुसार राज्यात १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ( )

वाचा:

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याचे सरकारी पातळीवरूनही सांगितले जाऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसांतील नवीन बाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. राज्यात बुधवारी २३ हजार १७९ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर आज त्यात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे २५ हजार ८३३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासोबत उपचारांच्या व्यवस्थेचे आव्हानही पुन्हा एकदा उभे ठाकताना दिसत आहे. त्यातूनच गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेली कोविड सेंटर्स कार्यरत करण्याची पावले उचलली जाऊ लागली आहेत.

वाचा:

राज्यात शहरी भागात पुन्हा एकदा करोनाचा जोर वाढला आहे. त्यात , , नाशिक, या शहरांतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ५३ हजार १३८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ % एवढा आहे. आज राज्यात २५ हजार ८३३ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १२ हजार १७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख ७५ हजार ५६५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.७९ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७९ लाख ५६ हजार ८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख ९६ हजार ३४० (१३.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख १३ हजार २११ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढून १ लाख ६६ हजार ३५३ इतकी झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजार ५३९ इतका झाला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात २४ हजार २०९, मुंबई पालिका हद्दीत १७ हजार १५३ तर जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ५४८ इतका झाला आहे. नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतही अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. मुंबई पालिका हद्दीत गेल्या २४ तासांत २ हजार ८७७ तर पुणे पालिका हद्दीत २ हजार ७९१ रुग्ण वाढले आहेत.

दरम्यान, आज राज्याने दैनंदिन करोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एका दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here