वाचा:
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर सिरोंचा पासून केवळ १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका चेक गावापासून जवळपास ८०० मीटर अंतरावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेले काम बोगस असल्याचे सांगून काम बंद करा, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या लगतच नक्षली बॅनर आढळल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. लावलेल्या बॅनरवर ‘बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा’ असा उल्लेख आहे आणि खाली ‘भाकप माओवादी’ असं लिहिण्यात आलं आहे.
वाचा:
अलीकडंच अबुझमाड जंगलातील नक्षल्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात सी-६० जवानांना मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर १० ते १२ दिवसांतच सिरोंचा तालुक्यात धमकीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या धमकीचा संबंध ‘सी-६०’ जवानांनी केलेल्या कारवाईशी जोडला जात आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times