अँटिलिया समोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ‘एनआयए’नं अटक केली आहे. वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांबरोबरच राज्य सरकारचीही बदनामी झाली. विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं होतं. परिणामी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परमबीर सिंह यांचाही त्यात समावेश होता. मात्र, बदलीनंतरही सिंह यांच्या पाठीशी असल्याचं चित्र आहे. ”च्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेनं परमबीर सिंह यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
वाचा:
‘परमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. करोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचं धैर्य ढळू दिलं नाही. त्यामुळं पुढं या प्रकरणात सीबीआय आली तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढं सीबीआयला जाता आलं नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघडली. त्यामुळंच परमबीर यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
राज्यातील विरोधी पक्षावरही शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. ‘पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळ्यांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावं. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्यानं आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times