जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Tests Corona Positive)

ठाकरे सरकारमधील २५ हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक आहे. सरकारमधील प्रत्येक मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी करोनाची काळजी घेताना दिसतात. असं असतानाही लोकप्रतिनिधींना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याआधी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, नितीन राऊत, सुनील केदार, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, अनिल परब, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. आता त्यात गुलाबराव पाटील यांची भर पडली आहे.

गुलाबराव पाटील यांनी काल रात्री ट्वीट करून चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली करोना चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here