तिसऱ्या अंपायरने बऱ्याच वेळा कॅचचा रिप्ले पाहून सूर्यकुमारला बाद ठरले. पण रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की चेंडूचा काही भाग जमीनीवर लागला आहे. तरी देखील तिसऱ्या अंपायरने त्याला बाद दिले. सोशल मीडियावर माजी खेळाडूंपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वजण या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. जाणून घेऊयात सॉफ्ट सिग्नलचा नियम आहे तरी काय?
वाचा-
जेव्हा मैदानावरील अंपायर एखाद्या निर्णयासाठी तिसऱ्या अंपायरकडे मदत मागतात तेव्हा त्यांना स्वत:चा निर्णय सॉफ्ट सिग्नलच्या माध्यमातून सांगावा लागतो. सूर्यकुमारच्या बाबत देखील असेच झाले आहे. मैदानावरील अंपायरचा निर्णय योग्य आहे का हे ठरवण्याचे काम तिसरा अंपायर करतो. आयसीसीच्या नियमानुसार सॉफ्ट सिग्नलचा निर्णय बदलला जाऊ शकतो. पण त्यासाठी पुरेसे पुरावे लागतात ज्यात हे सिद्ध व्हावे लागते की सिग्नल चुकीचा होता.
सूर्यकुमारच्या बाबत मैदानावरील अंपायरने बाद दिले होते. त्यामुळे त्याला बेनिफिट ऑफ डाउटचा फायदा मिळाला नाही. जर तिसऱ्या पंचाला रिप्लेमध्ये विश्वास झाला असता की, चेंडू जमीनीवर स्पर्श झाला आहे. तर त्याला नाबाद दिले असते.
वाचा-
सूर्यकुमारला बाद देण्याच्या निर्णयावरून विरेंद्र सेहवागने तर तिसऱ्या अंपायरने डोळ्यावर पट्टी बांधून निर्णय दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने तर आयसीसीने नियम बदलण्याची गरज आहे असे म्हटले आहे. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी देखील यावर मत व्यक्त केले आहे. सूर्यकुमारच्याबाबत कॅच स्पष्टपणे घेतल्याचे दिसत नाही. कारण थ्रीडी घटनेची ती टूडी इमेज आहे. मैदानावर आता थ्रीडी कॅमेऱ्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे या सामन्यात फक्त एकदा असे झाले नाही. प्रमाणे वॉशिंग्टन सुंदर बाबत देखील असे काहीसे झाले. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर जेव्हा आदिल रशिदने कॅच घेतला तेव्हा त्याच्या डावा पाय सीमारेषेवर लागला होता. मैदानावरील अंपायरने तेव्हा देखील सॉफ्ट सिग्नल त्याला बाद दिले. त्यामुळे सुंदरला चार धावांवर माघारी परतावे लागले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times