विजयनगर परिसरात असणाऱ्या जिल्हा न्यायालय परिसरात नातेवाइकांनी आणलेला मावा खायला दिला नाही, या रागातून पाच गुन्हेगारांनी पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तसेच त्यांनी जेलमधून सुटून आल्यावर तुला बघून घेऊ, अशी धमकी सुद्धा दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.
या हल्ल्यात पोलीस नाईक अर्जुन बापू घोदे (वय ३४) हे जखमी झाले असून, त्यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या उमर शहीद शेख, फारूक अजीज मुल्ला (वय ४०) , इरफान मुल्ला (वय ३३ तिघे रा. खणभाग), इलाईस मुसा मुल्ला (वय ३० रा. शामरावनगर) , सोहेल खान (वय २० रा. १०० फुटी रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी संजयनगर येथे २०१७ साली झालेल्या खुनातील आरोपी आहेत. त्यांना गुरुवारी तारखेसाठी न्यायालयात आणले असता, नातेवाइकांनी त्यांच्यासाठी मावा आणला होता. तो खायला दिला नाही म्हणून त्यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times