मागील विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती. शेतकऱ्यांचा मेळावाही घेतला होता. मात्र, त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. आता ते काँग्रेसमधून राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी त्यांनी काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला.
वाचा:
गणेश माने देशमुख हे ”चे अध्यक्ष असून सहकार क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. दुष्काळी भागातील जनतेला व शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठीही ते प्रयत्नशील असतात. सेंद्रिय शेतीवरही ते काम करतात. तरुण तडफदार नेतृत्व असलेल्या माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास पक्षाला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळं येत्या काळात अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times