सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता त्यांना पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरन व अन्य हत्या, या सर्वाला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी यापूर्वी नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा राणेंनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहलं आहे.
‘महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते. मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसंच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहलं आहे,’ असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times