ठाणे: मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी () यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ३० मार्च २०२१ रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात ( ) सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून () न्यायालयात आज जबाब दाखल करण्यात आला आहे. एटीएसकडून वाझे यांच्या कोठडीची मागणी केली जाऊ शकते, असे सूत्रांकडून समजते.

वाझेंना एनआयएकडून अटक

उद्योगपती यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी () एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मागील शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक केली होती.

अँटिलियाजवळ स्फोटके असलेली कार आढळली होती

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळील रस्त्यावर स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. या कारमध्ये धमकीचे पत्रही सापडले होते. त्यात मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले होते. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना एनआयएने अटक केली होती. या प्रकरणात वाझेंचा सहभाग असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती.

ठाणे कोर्टाने अंतरिम संरक्षण देण्यास दिला होता नकार

अंबानींच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या कारचे मालक () यांच्या मृत्यूने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. कळवा खाडीत त्यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणातही वाझे यांचे नाव आल्यानंतर एटीएसकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तर एनआयएने स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे कोर्टात मागील शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. त्यावेळी वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here