वाचा:
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरू असून शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्र सरकारनं त्याकडं दुर्लक्ष केलं आहे. करोना लॉकडाऊनमुळं देशात बेरोजगारी वाढली आहे. हजारोंच्या संख्येनं तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे दर रोजच्या रोज वाढत आहेत. त्यामुळं जनता मेटाकुटीला आली आहे.
वाचा:
याच अनुषंगानं जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून केंद्रातील मोदी सरकारला कुंभकर्णाची उपमा दिली आहे. ‘शेतकरी आंदोलनात जवळपास ३०० च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,’ असा प्रश्न पाटील यांनी ट्वीटमध्ये केला आहे. सोबत #WorldSleepDay असा हॅशटॅगही दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times