नागपूर: राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबई, ठाण्याबरोबरच नागपुरातही रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. तर, आजही नागपुरात मोठ्या संख्येनं करोना रुग्ण सापडले आहेत. मृत्यूचे आकडेही वाढले आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. विदर्भातही करोनाचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. आज नागपुरात तब्बल ३ हजार २३५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं नागपुरातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ७८७ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची अचानक होणारी वाढ प्रशासनाची चिंता वाढविणारी असून नागरिकांनीही योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

नागपुरातील वाढती रुग्णसंख्या पाहता हे शहर करोनाचा हॉटस्पॉट ठरतंय की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसंख्येबरोबरच करोनामुळं दगावलेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. गेल्या २४ तासांत ३५ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या ४ हजार ५६३ इतकी झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने बरे होणाऱ्यांची टक्केवारी घसरली आहे. आज नागपुरात १ हजार २४५ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, नागपुरात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ६५५ इतकी आहे. तर, सध्या २५ हजार ५६९ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here