मुंबईः मुंबईत करोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल २ हजार ८७७ नवीन रुग्ण आढळले होते. तर, आज शुक्रवारी मुंबईत करोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ०६२ रुग्ण सापडले आहेत.

रूग्णवाढीमुळे करोनाचा संसर्ग पुन्हा फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढती रूग्ण संख्या रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना आणि चाचण्या वाढवल्या आहेत. मुंबईत डिसेंबरनंतर रुग्ण संख्या नियंत्रणात आली होती. रोज दोन ते अडीच हजारांपर्यंत आढळणारे रुग्ण कमी झाले. जानेवारीत ही संख्या आणखी कमी होत गेली. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सुरु करण्यात आली. मात्र त्यानंतर हळूहळू रूग्ण संख्या वाढीस लागली आहे.

शुक्रवारी मुंबईतील एकूण करोना बाधितांची संख्या ३ लाख ५५ हजार ८९७ इतकी झाली आहे. तर, आज १० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा ११ हजार ५६५ वर पोहोचला आहे. तर, दिवसभरात १ हजार ३३४ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख २३ हजार २८१ इतकी झाली आहे. तर, सध्या २० हजार १४० अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here