डेहराडूनः उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री ( ) यांनी फाटक्या जिन्सवर वक्तव्य केल्याने वादात आले होते. सोशल मीडियासह इतर स्तरातूनही त्यांच्यावर टीका झाली. आता वाढता वाद पाहता अखेर रावत यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. आपलं वक्तव्य हे संस्कारासंबंधी होतं. पण तरीही कुणाला फाटकी जिन्स घालायची असेल तर ते घालू शकता. आणि आपल्या वक्तव्याने कुणाचं मन दुखावलं असेल तर त्यासाठी माफी मागतो, असं रावत म्हणाले.

महिलांनी रिप्ड जीन्स घालण्यावर तीरथ सिंह रावत यांनी मंगळवारी डेहराडूनमधील एका कार्यक्रमात आक्षेप घेतला होता. आजकाल महिलाही फाटक्या जिन्स घालतात. त्यांचे गुडघेही दिसतात. हे कोणते संस्कार आहेत? हे संस्कार कुठून येतात. यातून मुलं काय शिकणार आणि महिलांना यातू समाजात काय संदेश द्यायचा आहे? फाटकी जिन्स आपला समाज तोडण्याचे काम करत आहे. अशा प्रकारचे कपडे घालून आपण आपल्या मुलांसमोर वाईट उदाहरण मांडत आहोत. जे त्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाकडे वळतात. आता आपण आपल्या मुलांना कात्रीने संस्कार देत आहोत, असं रावत म्हणाले. होते. यापूर्वी रावत यांनी वक्तव्य करत पंतप्रधान मोदींची तुलना भगवान राम आणि श्रीकृष्णाशी केली होती.

रावत यांची पत्नीच होती मिस मेरठ

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले रावत हेत पक्षात अत्यंत संयमी आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तीरथ यांनी विद्यार्थी परिषदेतील आपली सहकारी आणि मिस मेरठ राहिलेल्या रश्मी यांच्यासोबत आंतरजातीय विवाह केला. तीरथजींना अतिशय साधी राहणी पसंत आहे आणि ते खुल्या विचारांचे आहेत. माध्यमांनी त्यांचे विचारे मोडून तोडून मांडले, अशी प्रतिक्रिया रश्मी यांनी या वादावर दिली.

२० वर्षांचे असताना संघाचे प्रांत प्रचारक

तीरथ सिंह रावत यांचा जन्म ९ एप्रिल १९६४ मध्ये पौडीमधील सीरो गावात झाला. भावांमध्ये सर्वात लहान असलेले रावत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. आपल्या कार्यामुळे फक्त २० वर्षाचे असताना ते संघाचे प्रांत प्रचारक झाले. १९८३ ते १९८८ संघाचे प्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) पाठवण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here