नवी दिल्ली : गेल्या वर्षी करोना संकटाने मंदीच्या फेऱ्यात अडकलेली भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात जबरदस्त उसळी घेईल, असा विश्वास या जागतिक पातळीवरील पत मानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेने डिसेंबरमध्ये सकारात्मक कामगिरी केली होती. डिसेंबरमध्ये जीडीपी दर ०.४ टक्के वाढला होता. गेल्या दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २०२१ मध्ये विकास दर १२ टक्क्यांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज मुडीजने व्यक्त केला आहे.

करोना संकटात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ज्यात देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेतील मागणी वाढली आहे. त्यामुळे कारखाना उत्पादन क्षेत्राला गती मिळाल्याचे मुडीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. पुढील काही तिमाहींमध्ये खासगी क्षेत्रातील खप आणि गुंतवणूक यांचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे बाजारातील एकूण मागणीला चालना मिळेल, असे मुडीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

२०२१ मध्ये भारताचा जीडीपी १२ टक्के राहील. तर २०२१ अखेर रियल जीडीपी ४.४ टक्के जो करोना पूर्व स्थितीमध्ये होता किंवा डिसेंबर २०२० मध्ये जीडीपी ५.७ टक्के होता जो २०२१ अखेर राहील, असे मुडीजने म्हटलं आहे. सरकारकडून पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी खर्च वाढवण्यात येईल तर रोजगार निर्मितीसाठी देखील प्रयत्न केले जातील, असे मुडीजने म्हटलं आहे. २०२१ मध्ये महागाई नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील, असे मुडीजने म्हटलं आहे.

करोना लसीकरण मोहिमेबाबत देखील मुडीजने समाधान व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यास करोना लसीकरण मोहीमेचा हातभार लागला असल्याचे मुडीजने म्हटलं आहे. १६ मार्च अखेर देशात साडेतीन कोटी नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here