: गेल्या वेळेपेक्षा यावेळचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन व प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात करोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ( )

वाचा:

करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी पालिका आयुक्तांना दिले. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

वाचा:

करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मुख्य सचिव यांनी करोना बाबत त्रिसूत्रीसोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्णवाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांचेकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.

वाचा:

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा मिळून करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले. तसेच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबींमधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक पालिका प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजना जसे वैद्यकीय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. बैठकीला पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे हेसुद्धा उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here