नवी दिल्लीः इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरण्यात येत असलेले व्हॉट्सअॅपचे सर्व्हर जगभरात डाउन झाले होते. व्हॉट्सअॅपच नव्हे तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकही अनेक ठिकाणी डाउन आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री ११ वाजता जवळपास तिन्ही सर्व्हर डाउन झाले होते. युजर्सना अॅप आणि वेब सेवेचा उपयोग करण्यात अडचणी येत होत्या.
तिन्ही सेवा या फेसबुकच्याच आहेत. झुकरबर्ग हा त्यांचा मालक आहे. व्हॉट्सअॅप, आणि इन्स्टाग्राम एकाचवेळी डाउन झाल्याने ट्वीटरवर मार्क झुकरबर्ग ट्रेंडवर होते. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन हेही ट्वीटर ट्रेंड आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times