वाचा:
अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवली त्यावेळी सचिन वाझे तिथे हजर होते, असा एनआयएला संशय आहे. याठिकाणी जिलेटिनच्या कांड्यांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. त्या कारसोबत एक इनोव्हा गाडीही होती आणि त्यातून उतरलेली व्यक्ती म्हणजे सचिन वाझे होते का, याचा तपास एनआयएकडून सुरू आहे. इनोव्हातून उतरलेल्या व्यक्तीने सदरा घातला होता व डोक्यावर रुमाल ठेवला होता. ही व्यक्ती काही अंतर चालून परत मागे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे फुटेज तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरले असून त्याचा फोड करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. त्यासाठीच थेट घटनास्थळी जाऊन आज संपूर्ण घटनाक्रमाचं प्रात्यक्षित केलं गेलं.
वाचा:
सचिन वाझे यांना घटनास्थळी नेण्यात आलं. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित होती. सुरुवातीला काही पॉइंट मार्क करण्यात आले आणि त्यानंतर आहे त्याच साध्या वेषात वाझे यांना चालण्यास सांगण्यात आलं. अशाप्रकारे तीवेळा त्यांना पुढे जाऊन मागे येण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांना सदरा देण्यात आला. सदरा घालून तसेच डोक्यावर रुमाल ठेवून वाझे यांना परत एकदा चालण्यास सांगण्यात आले. जवळपास दीड तास हे सीन रिक्रिएशन सुरू होतं. त्यानंतर वाझे यांना घेऊन टीम माघारी गेली.
दरम्यान, उपस्थित एनआयए अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्हाला आमचे काम करू द्या, अशी विनंती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times