नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींच्या आज दोन प्रचारसभा ( ) होणार आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पंतप्रधान मोदींच्या आज प्रचारसभा होतील. विधानसभा निवडणुकीत ( ) पश्चिम बंगाल आणि आसामच्या जनतेने एनडीएला मत देण्याचं निश्चित केलं आहे, असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालमधील खडगपूर आणि आसाममधील छाबुआ येथे जाहीर प्रचारसभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. आपल्या सभेत भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडणार आहे. दोन्ही राज्यातील जनतेला एनडीएचे सरकार निवडून आणायचे आहे, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलंय. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी आसामच्या करीमगंज आणि पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये प्रचारसभा घेतल्या. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला हटवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी २१ मार्चला बांकुरामध्ये आणि २४ मार्चला कांथी येथे प्रचारसभा घेणार आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये भाजप २१ मार्चला म्हणजे रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. गृहमंत्री अमित शहा यासाठी रविवारी एक दिवसाच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शहा हे बंगालमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करतील. यासोबत महत्त्वाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तृणमूल काँग्रेसने आधीच आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

अमित शहा हे पल्लीघाई स्कूल ग्राउंडवर रविवारी दुपारी एक प्रचारसभाही घेणार आहेत. ही सभा कांती जिल्ह्यात होणार आहे. यानंतर ते पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मछेदामध्ये दुपारी १.३० वाजता जिल्हा आणि विभागीय स्तरावरील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर शहा हे संध्याकाळी ५.३० वाजता आपला जाहीरनामा प्रकाशित करतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here