अमरावती: मुंबईत यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांचं प्रकरण गाजत असतानाच अमरावतीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ किलो वजनाच्या जिलेटिनच्या २०० कांड्या आणि २०० डिटोनेटर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ( )

वाचा:

तिवसा येथील पंचवटी चौक येथे गस्तीपथकाकडून दोन अज्ञात बाइकस्वारांना चौकशीसाठी थांबवण्यात आलं होतं. मात्र चौकशी सुरू असतानाच त्यांच्याकडील बॅग फेकून ते पसार झाले होते. बॅगमध्ये स्फोटके असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावले. पडताळणीअंती बॅगमध्ये २०० आणि २०० जिवंत डिटोनेटर असल्याचे आढळून आल्याने सगळेच हादरले. त्यानंतर पसार झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला.

वाचा:

पोलिसांनी काही वेळातच याप्रकरणी (सातरगाव, लोणी ) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही स्फोटके अंकुश लांडगे (करजगाव, लोणी ) याला विकली असल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंकुश लांडगे याचा शोध घेतला मात्र, पोलिसांची चाहुल लागताच तो निसटला आहे. अटकेतील आरोपी सुमीत सोनोने याच्यावर तिवसा पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ५, ९ (ब) (१) तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम २८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा अवैध साठा आढळून आल्याने पोलीसही चक्रावले आहेत. ही स्फोटके नेमकी कोणत्या उद्देशाने खरेदी केली गेली होती, सुमीत सोनोने याच्याकडे इतकी स्फोटके आली कुठून, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here