पुणे: शहरात ठाण्याच्या हद्दीत आता पोलीस सायकलवरुन गल्ली बोळात पेट्रोलिंग करणार आहेत. त्यामुळे पोलिसांची शारिरीक तंदरुस्तीबरोबरच नागरिकांसोबत अधिकाधिक संपर्क आल्यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना वाढण्यास मदत होणार आहे. ( Latest News )

वाचा:

समर्थ पोलीस ठाण्यात शुक्रवारी आयुक्त , पोलीस सहआयुक्त यांच्या हस्ते पोलिसांना दहा सायकल भेट देण्यात आल्या तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मिनी स्पोर्ट ग्राऊंड याचेही उद्घाटन झाले. यावेळी उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, आयर्न पदक विजेते कौस्तुभ राडकर उपस्थित होते. समर्थ पोलिसांना दहा अत्याधुनिक फँटम कंपनीच्या सायकल पेट्रोलिंगसाठी यावेळी देण्यात आल्या. तसेच, पोलीस ठाण्याच्या पाठीमागे व्हॉलिबॉल, बॅटमिंटन, हँडबॉल या खेळाचे मिनी स्पोर्ट तयार करण्यात आले आहे.

वाचा:

पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टी परिसरात अरूंद रस्ते आणि गल्लीबोळ असते. त्यामुळे गस्त घालताना पोलिसांना वाहनांच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे गल्लीबोळातही पोलिसांचे पेट्रोलिंग सक्षम करण्यासाठी सायकलींचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेकडून पुणे पोलिसांना गस्तीसाठी देण्यात आलेल्या अद्यावयात १० सायकलींना गिअर आहेत. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी शुक्रवारपासून सायकलवरून पेट्रोलिंगला सुरुवातही केली. दिवसासह रात्री ठराविक वेळेत पोलीस हद्दीत सायकलवरून गस्त घालणार आहेत. सायकलवर गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांनी दररोज काही अंतर कापल्यानंतर व्यायामही होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. यामुळे गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासही मदत होणार आहे, असे सांगण्यात आले.

वाचा:

पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेच्या भावना वाढीसाठी हा उपक्रम खूपच चांगला आहे. हा उपक्रम अखंडीतपणे सुरू ठेवा. यामाध्यमातून जनेतमध्ये निश्चित चांगला संदेश जाईल. तसेच, पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर पूर्ण सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणारे समर्थ हे एकमेव पोलीस ठाणे होणार आहे, असे पुणे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here