नवी दिल्लीः केंद्र सरकारची कार्यालये आणि सरकारी उपक्रमांमध्ये भ्रष्टाचाराचा छडा लावण्यासाठी सीबीआयने देशभर छापे ( ) टाकले. भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने व्यापक मोहीम राबवत २५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील १०० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकत तपासणी केली आणि कागदपत्र जप्त केली.

कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सीबीआयच्या तपासणीत सरकारची ३० खाती आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये तपासणी केली गेली. संबंधित विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये या तपासणीवेळी दक्षता विभागाचे अधिकारीही सीबीआयच्या टीमसोबत होते, अशी माहीत सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एफसीआय, रेल्वे, आयओसी, कस्टम, एनडीएमसी, उत्तर दिल्ली महापालिका, सीपीडब्ल्यूडी, बीएसएनएल, एनबीसीसी, जीएसटी, टपाल विभागाचा समावेश आहे. ज्या ठिकाणी छापेमारी केली गेली तिथून बऱ्याच काळापासून भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराच्या तक्रारी येत होत्या. पण एफआयआर दाखल करून पुढील कारवाईसाठी पुरावे मिळत नव्हते, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

सर्व तक्रारी आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर विविध विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कार्यलयांची माहिती काढली गेली. यानंतर सर्व ठिकाणी छापे टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास तीन महिन्यांपासून यासाठी तयारी सुरू होती आणि त्याची कुणकुण कुणालाच लागू दिली नाही.

केंद्रीय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अश प्रकारची छापे महत्त्वाचे ठरतात. भ्रष्टाचार आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर संबंधिक अधिकाऱ्यांविरोधात कारवाई निश्चित केली जाते. शुक्रवारी ज्या ठिकाणी छापे टाकले गेले त्यात मेरठ, प्रयागराज, बदरपूर, गोरखपूर, आग्रा, फिरोजपूर, पाटणा, रांची, धनबाद आणि दिल्लीचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here