ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणात ”च्या हाती ठोस पुरावे लागले असून, त्याआधारे त्यांनी शुक्रवारी वाझे यांच्या अटकपूर्व जामिनास विरोध दर्शवला. वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान, मनसुख हे मृत्यूच्या आदल्या दिवशी वाझे यांच्यासोबत व्हॉट्सॲप कॉलवरून संपर्कात होते. इतकेच नाही, तर दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्येही मनसुख हे वाझे यांना भेटल्याचे ‘एटीएस’च्या सूत्रांनी सांगितले. याच आधारे ‘एटीएस’ने न्यायालयातून ‘प्रोडक्शन वॉरंट’ मिळवला असून, ”कडील कोठडीची मुदत संपल्यानंतर ‘एटीएस’ कधीही वाझे यांचा ताबा घेऊ शकते.
वाचा:
मनसुख हिरन यांचा मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’कडून करण्यात येत आहे. या प्रकरणात वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, वाझे यांनी संभाव्य अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, १२ मार्च रोजी न्यायालयाने वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार देत, पुढील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली होती. त्यानुसार शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांच्या न्यायालयात याबाबत दुपारी सुनावणी होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली होती. यावेळी न्यायालयात ‘एटीएस’ने त्यांचे लेखी म्हणणे मांडले. वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, असे ‘एटीएस’चे म्हणणे आहे. तसेच ४ आणि ५ मार्चचा घटनाक्रमही जाणून घ्यायचे असल्याचे ‘एटीएस’चे म्हणणे असून, कटामध्ये सहभाग कसा होता? हे निष्पन्न करायचे आहे. तसेच साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. शिवाय चोरीचा ऐवज हस्तगत करायचा असून, स्कॉर्पिओ गाडी आणि बोगस नंबरप्लेट विषयी जाणून घ्यायचे असल्याचेही ‘एटीएस’चे म्हणणे आहे. चौकशीबाबत वाझे यांची कस्टडी आवश्यक असल्याचेही ‘एटीएस’ने म्हटले आहे.
वाचा:
‘एटीएस’ने १० पानांचे म्हणणे मांडले असून, ते वाचण्यास मिळालेले नाही. शिवाय माझ्या अशिलाकडून सूचना घेणे बाकी असल्याने सुनावणीची पुढील तारीख घेतली असल्याचे वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी सांगितले. त्यामुळे येत्या ३० मार्चला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशिलाची भेट व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही कालेकर यांनी सांगितले.
वाझेंच्या बहिणीचा न्यायालयात अर्ज
माध्यमांकडून कुटुंबाला होत असलेल्या त्रासाबाबत यांची बहीण अनुराधा हटकर यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत काही विचारणा करू नये, तसेच प्रश्न देखील करू नये, असेही त्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर आणि ठाणे येथील घरी जाऊन नातेवाईकांना त्रास देण्यात येत असल्याचेही अर्जात नमूद आहे. याबाबत त्यांना कोणी त्रास देणार नाही याची दक्षता घेण्याबाबत न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्याचे अॅड. कालेकर यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times