म. टा. प्रतिनिधी, मुंबई
बदलत्या काळानुसार राहणीमान बदलते. त्याच धर्तीवर भारतीय संविधानात संशोधन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेतेमंडळी सतत करीत असतात असा आरोप करून, संघाचे हे मनसुबे आम्ही हाणून पाडू, असा इशारा मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आ. यांनी शुक्रवारी दिला.

संघाच्या मनसुब्यांना काँग्रेसने सतत रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखीव करण्यात आलेला फंड केंद्रातील सरकारने वापरलाच नाही. हा निधी सुमारे ५० हजार कोटींच्या घरात आहे. मात्र, हे पैसे कोणाही सत्ताधाऱ्यांच्या मालकीचे नाहीत असा टोला जगताप यांनी लगावला.

देशातील भारतीय नागरिकांना स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य केवळ काँग्रेसमुळे मिळाले आहे. काँग्रेसनेच या देशामध्ये सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार दिला. भाजप सरकारने केवळ जाती-धर्माचे राजकारण केले आहे. एखाद्या विशिष्ट समाजाला गोंजारून देश चालत नाही. देश चालवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालावे लागते. काँग्रेसने मागील ७० वर्षांत वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. मुंबई काँग्रेसचे सचिव, मातंग समाजाचे नेते विकास तांबे यांच्यातर्फे करोनाकाळात मातंग समाजाच्या ज्या लोकांनी नागरिकांसाठी काम केले, त्या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाई जगताप बोलत होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here