मुंबई: सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील फेरबदलानंतर आता गृहमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान गृहमंत्री यांनी शुक्रवारी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीनं अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. ( As Home Minister)

वाचा:

अँटिलिया समोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करून सरकारनं विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ पोलीस अधिकाऱ्यांचाच बळी दिला जात असल्याचा आरोप आता सरकारवर होत आहे. पोलीस दलातही नाराजी आहे. तसंच, अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेतला जावा, असा महाविकास आघाडीमध्येही सूर आहे. त्यामुळं राष्ट्रवादीतही यावर खल सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं. अनिल देशमुख यांनी ही चर्चा फेटाळली असली तरी कालच्या तातडीच्या भेटीमागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे.

वाचा:

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव पुढं आलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी यापूर्वी अर्थ, संसदीय कामकाज, ग्रामविकास, जलसंपदा अशी अनेक खाती सांभाळली आहे. सध्या मंत्रिपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शरद पवार यांच्याशी पूर्वीपासून एकनिष्ठ असून यांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. पक्षाबरोबर महाविकास आघाडीतील इतर सहकाऱ्यांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. त्यामुळं त्यांचं नाव गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here