मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती आपले फोटो आणि आगमी चित्रपटांच्या अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करताना दिसते. अनेकदा साराचे सोशल मीडियावरील फोटो व्हायरल सुद्धा होतात. आताही सारानं नुकतेच ब्रायडल फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

तिच्या या फोटोंसोबतच त्याच्या कॅप्शनची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. सारानं या फोटोला दिलेलं कॅप्शन पाहून साराला एवढ्या लवकरच लग्नाचे वेध लागले की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. सारा अली खानचे लेटेस्ट इन्स्टाग्राम फोटो सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी सारानं नुकतंच ब्रायडल फोटोशूट केलं. त्याचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोसोबत तिनं लिहिलेलं कॅप्शन मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वधूच्या वेशात दिसत आहे. आपल्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘या सुंदर, सुशील, कुटुंबप्रिय आणि संस्कारी मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव आहे का?’

साराच्या कॅप्शनची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू असून साराला एवढ्या लवकर लग्नाचे वेध लागले की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान सारानं या फोटोशूटचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून साराचा हा ब्रायडल अवतार तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

सारा अली खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, ती शेवटची कुली नंबर १च्या रिमेकमध्ये वरुण धवनसोबत दिसली होती. तिचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला होता. पण प्रेक्षकांवर मात्र हा चित्रपट फारशी छाप पाडू शकला नाही. यानंतर लवकरच सारा आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here