स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे ४० ते ५० कामगार अडकले होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या स्फोटात जखमी झालेल्या इतर कामगारांना जवळच्या कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरडा कंपनीतील बॉयलर अतिशय गरम होऊन अचानक स्फोट झाले असे प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.
या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दरम्यान गेल्या वर्षभरातील लोटे एमआयडीसीतील ही सहावी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या एमआयडीसीचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक आमदार योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times