महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून करोनाची सध्याची आकडेवारी ट्वीट करण्यात आली आहे. राज्यातील ठाकरे सरकार करोना रोखण्यात कसं अपयशी ठरलंय हे यातून दाखवण्यात आलंय. ‘देशातील करोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारनं महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. करोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडं दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय,’ असं भाजपनं म्हटलं आहे. तसंच, त्यासाठी देशातील व महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची आकडेवारी देण्यात आलीय. या आकड्यांचा भागाकार, गुणाकार करून उत्तरही काढण्यात आलंय. देशाच्या तुलनेत राज्यातील करोनाची वाढलेली टक्केवारी सांगून ‘ठाकरे सरकारची पोरं हुश्शार’ असा टोलाही भाजपनं हाणला आहे.
शुक्रवारची शहर व पालिकानिहाय आकडेवारी
राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी २५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी नव्यानं सापडलेल्या रुग्णांची शहर व पालिकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे: मुंबई ३०६३, ठाणे जिल्हा २५६, ठाणे मनपा ५५२, नवी मुंबई मनपा ३९१, कल्याण डोंबिवली मनपा ६४४, पनवेल मनपा २३९, रायगड १४१, नाशिक मनपा ९३९, नाशिक जिल्हा ५१४, जळगाव ७६४, अहमदनगर ४४१, नंदुरबार ४२४, पुणे मनपा २८७२, पिंपरी- चिंचवड मनपा १३२४, पुणे जिल्हा ९०२, औरंगाबाद मनपा १३१३, औरंगाबाद जिल्हा ५६७, जालना ६८५, नांदेड मनपा ४५६, नांदेड जिल्हा ३४५, बुलढाणा ४४२, यवतमाळ ४३२, अकोला मनपा ४३१, अकोला जिल्हा २२७, नागपूर मनपा २६१७, नागपूर जिल्हा ६८१, वर्धा ३५७ अशी शुक्रवारची नवीन करोना बाधित रुग्णसंख्या आहे.
वाचा:
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times