वाचा:
‘एएनआय’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेती बंद येथे आढळलेला मृतदेह ४८ वर्षीय इसमाचा असून शकील सलीम अब्दुल असं त्याचं नाव आहे. तो येथील रहिवासी आहे. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मनसुख प्रकरणाशी या मृतदेहाचा काही संबंध आहे का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
कोण होते मनसुख हिरन?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पियो कार सापडली होती. ही कार मनसुख हिरन या व्यावसायिकाची असल्याचं समोर आलं होतं. ही कार तिथं कशी आली, याचा तपास सुरू असतानाच हिरन यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला होता. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली होती. ही आत्महत्या असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं होतं. मात्र, त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता शवविच्छेदन अहवालानंतर पुढं आली. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचे धागे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. निलंबित सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times