मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं जून २०२० मध्ये राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. नैराश्याच्या गर्देत असलेल्या सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडवर टीका झाली. एवढंच नाही तर सुशांतची को-स्टार कृती सेनॉनवरही सुशांतच्या चाहत्यांनी टीका केली होती. सुशांत आणि कृती खूप चांगले मित्र होते आणि असं असतानाही कृतीनं एक सोशल मीडिया पोस्ट वगळता सुशांतच्या आत्महत्येबाबात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ज्यावरून सुशांतच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका केली होती. पण आता अखेर या सर्वांवर मौन सोडलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणाऱ्या कृती सेनॉनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘त्यावेळी सर्वच ठिकाणी एवढा गोंधळ सुरू होता. सर्वजणच त्यावर काही ना काही बोलत होते. एक वेळ अशीही आली की, या सर्वात मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता दिसू लागली होती. या नकारात्मकतेत मला सहभागी व्हायचं नव्हतं.’

कृती पुढे म्हणली, त्यावेळी मला काय जाणवत होतं किंवा किती दुःख झालं होतं हे केवळ मलाच माहीत होतं आणि मला ते स्वतःपूरतच मर्यादित ठेवयचं होतं. मला काय वाटतंय किंवा काय जाणवतं आहे हे मी कोणाला सांगावं असं मला त्यावेळी अजिबात वाटलं नाही. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला सोशल मीडियावर जे बोलायचं ते बोलायला ते तुम्ही बोलू शकता. व्यक्त होऊ शकता.

सुशांतच्या निधनानंतर कृतीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात तिनं लिहिलं, ‘सुश… मला माहीत आहे तुझ्या हुशार मेंदूच तुझा खास मित्र होता आणि तोच तुझा सर्वात मोठा शत्रू सुद्धा. पण तुला जगण्यापेक्षा मरण सोपं वाटलं हे पाहून मला सर्वात जास्त दुःख झालं. कदाचित तुझ्यासोबत त्यावेळी अशी कोणतरी व्यक्ती असती जी तुला समजावू शकली असती, तुझ्या आतमध्ये जे तुटलं होतं त्याला जोडू शकली असती आणि तुला कायमचं जिवंत ठेवू शकली असती तर खूप चांगलं झालं असतं.’

कृती सेनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिच्याकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर सध्या ती ‘भेडिया’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त तिच्याकडे प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here