मुंबई: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाच्या दररोज नवनवीन गोष्टी घडताना दिसत असून, आता राज्य दहशतवाद विरोधी पथक () करत असलेला या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे () देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसे अधिकृत आदेशच जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे हा एटीएसला एक धक्का असल्याचे मानले जात आहे.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरन मृत्यू प्रकरण आणि त्याला जोडले गेलेले सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यात एनआयएने एंट्री घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सचिन वाझे यांच्याविरोधात एनआयएकडे अनेक पुरावे असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणातील करत असलेला तपास एनआयएकडे घेतल्याने या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे राज्याच्या राजकारणावर देखील याचे पडसाद उमटणार आहेत.

राज्य दहशतवादविरोधी पथकाक (ATS) मनसुख हिरन मृत्युप्रकरणाचा तपास करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात यावा, अशी मागणी विरोधीपक्षाकडून करण्यात येत होती. तर फक्त मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास करत होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील वारंवार असा तपास सुरू असल्याचे सांगत होते. मात्र अखेर याा तिन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करणार आहे.

एनआयए आता एटीएसकडे असलेल्या सर्व तपासाचा तपशील आपल्याकडे घेणार आहे. दरम्यान, एनआयचे एक पथक सचिन वाझे यांच्या साकेत या सोसायटीमध्ये तपासासाठी दाखल झाले आहे.

मनसुख हिरन मृत्यू प्रकरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरन यांचा मृतदेह 5 मार्च या दिवशी आढळला होता. मनसुख हिरण यांच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. हिरन आत्महत्या केली की त्यांच्या खून करण्यात आला हे अजूनही उघड झालेले नाही. मात्र, मनसुख हिरन यांची हत्याच झाली आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here