सोलापूर : राज्यातील जनतेला आलेली भरमसाठ वीजबिलं ही ट्रायच्या प्रस्तावावर विचार न करता, सुनावणी न घेता राज्यमंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे. या निर्णयामुळे आज सर्वसामान्य ग्राहकांना दुप्पट भरावं लागत आहे. त्याला सरकारच जबाबदार आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हा आरोप केला. यावेळी ‘खोटारडा मंत्री’ म्हणत आंबेडकर यांनी यांच्यावरही शरसंधान केले. ( )

वाचा:
सध्या सरकारच्या ऊर्जा खात्याने जी वाढीव वीजबिलं दिली आहेत. ती विजेच्या अधिक वापरामुळे आली आहेत की खुद्द राज्य सरकारने केलेल्या दरवाढीमुळे आहेत, याची कुठल्याही मंत्र्याबरोबर आणि कुठल्याही मैदानावर खुली चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. करोनाचं भांडवल करून सरकारने विजेचे दर दुप्पट केले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

वाचा:

काळातील थकीत वीजबिल शासनाने माफ करावे अशी मागणी राज्यभरातून होत असताना राज्याचे ऊर्जामंत्री यांनी थकीत बील माफ करण्याच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर केला असताना, राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या प्रस्तावाला अडचण निर्माण केली, असा आरोप करत आंबेडकर यांनी आगामी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, मतदारांनी थकीत वीज बिलाच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या अजित पवार या खोटारड्या मंत्र्याला त्याची जागा दाखवून द्यावी, असं आवाहन केलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here