नाशिक येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गुरुवारी मोदी, शहा यांची भेट घेतली. त्यानंतर वाझे प्रकरणाचा तपास एटीएसकडून ‘एनआयए’कडे गेला. फडणवीसांच्या या दिल्ली वारीबद्दल विचारलं असता राऊत यांनी वरील उत्तर दिलं. एटीएस सक्षम असताना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. ‘एनआयए’ला आणण्याची घाई करायला नको होती. एनआयएकडं तपास गेल्यामुळं राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जो तपास करायचा आहे तो करू द्या. कोणीही आलं आणि कोणत्याही पद्धतीनं तपास केला तरी सत्य बाहेर येईलच. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले.
वाचा:
‘यूपीएचं नेतृत्व आतापर्यंत काँग्रेसनं केलं आहे. आता सोनिया गांधींची प्रकृती बरी नाही. त्यामुळं यांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी इच्छा मी व्यक्त केली होती. विरोधी आघाडी मजबूत करायची असेल तर ते होणं गरजेचं आहे. पवार हे ताकदीचे नेते आहेत. एनडीएमध्ये सुद्धा असा नेता आज नाही,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
‘पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढतील पण बहुमत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसलाच मिळेल, असं भाकित राऊत यांनी वर्तवलं. छोट्या पडद्यावरील रामानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणलं असता राऊत म्हणाले, ‘रामासोबत रावणही गेलाय. पण हे रामायण वेगळं आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जींच्या सोबत आहे. तिथं महाभारत घडणार,’ असा दावाही राऊत यांनी केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times