नाशिक: जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीत भाजपला पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेचे नेते आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. निवडणूक मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेवर केलेल्या जोरदार टीकेचा समाचार घेत शिवसेनेचे नेते आणि खासदार यांनी भाजपला खरमरीत शब्दात सुनावले आहे. ( criticize over its comment on )

भाजपला जोरदार झटका देत शिवसेनेने भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. शिवसेनेच्या या विजयामुळे भाजपच्या हातून सलग दुसरी महापालिका हातातून निसटली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला, असा थेट आरोपच भाजपने शिवसेनेवर केला.

भाजपच्या या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. घोडेबाजाराचा आरोप कोणी कोणावर करावा?, भाजपने याआधी घोडेबाजार केला नाही का, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. भाजपने कसा घोडेबाजार केला असे सांगताना, पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही, तर काय गाढवबाजार होता, असा प्रतिप्रश्न राऊत यांनी भाजपला विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवावे, अशी मागणी देखील केली.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव केला. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटले. तसेच एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेलाच मतदान केले. आमुळे शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here