राज्यातील सरकार मजबूत आहे. ते सरकार लोकांच्या मनातून उतरवण्यासाठी हा बालिश प्रकार भाजपने केला आहे असा प्रतिआरोप करतानाच हा कट थोड्याच दिवसात उघडकीला येईल, असेही त्या म्हणाल्या
विद्या चव्हाण या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलत होत्या. पोलिस सेवेत असलेला मोठा अधिकारी गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद असल्याशिवाय असे आरोप करू शकत नाही. सिंग यांनी केलेला आरोपच मुळात बालिश आहे. कारण इतका खुलेआम भ्रष्टाचार कोणीही करत नाही. ज्या देशाचे गृहमंत्री स्वत: तडीपार असतात, त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप असतात, त्यांच्या डोक्यातून अशी सुपिक कल्पना निश्चितच निघू शकते. आज महाराष्ट्राने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पाहिलेली आहेत. मात्र कोणताही भ्रष्ट्राचार इतक्या खुलेआम होत नाही. हे आज ५-७ वेळा निवडून आले आहेत. २५-३० वर्षे त्यांनीही राजकारणात घालवली आहेत आणि भ्रष्टाचार इतक्या खुलेआम करण्याचा मू्र्खपणा कुठलाही मंत्री करणार नाही, असे चव्हाण पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
परवा चंद्रकांत पाटील म्हणाले होते की…
परवा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की अनिल देशमुख यांचा राजीनामा मी घेणार. पाटील कशाच्या आधारावर असे म्हणाले? काल देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे कुटील कारस्थान रचले गेले आहे. अशी कारस्थाने रचण्यात भाजप वाकबगार आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
परमबीर सिंग पोलिस आयुक्त होते, हवालदार नव्हते. अशी व्यक्ती एक दिवस उशिरा का बोलते? ज्यावेळेला खंडणी वसूल करायला सांगितली तेव्हाच विरोध का केला नाही, असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे. परमबीर सिंग हे देवेंद्र फडणवीस यांचे खास होते अशी मला माहिती मिळाली आहे. एनआयएमध्ये देखील एक खास अधिकारी फडणवीस यांचा त्यांचा मित्र आहे असे सांगत परमसिंगना दिलेले पत्र हे भाजपनेच दिले आहे हे मी डोळे झाकून सांगू शकते असेही चव्हाण ठामपणे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
देश आणि महाराष्ट्रातील महत्वाचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. करोनामुळे लोक बेरोजगार झाले आहेत. जीएसटीचा मुद्दा आहे, हे महत्वाचे मुद्दे बाजूला सारून लक्ष विचलित करण्यासाठीच आणि महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि केंद्र सरकारने रचलेले हे कुटील कारस्थान आहे, असे चव्हाण म्हणाल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times