अंडरवॉटर किसिंग सीनमुळे हा सिनेमा रिलीजच्या अगोदरच चर्चेत आला होता. या एका सीनसाठी दोघांना पाण्यात १० तास शुटिंग करावी लागली होती, असं आदित्यने एका मुलाखतीत सांगितलं.
दिशा पटानीनेही या सीनबाबतचा अनुभव सांगितला. ट्रेनिंगसाठी फक्त एक दिवस होता. सलग शुटिंग सुरू असल्यामुळे फार वेळही नव्हता आणि प्रचंड थकवा आलेला होता. पण शुटिंगसाठी १० तास पाण्यात रहावं लागलं, असा अनुभव दिशाने सांगितला.
अत्यंत खोलात गेल्यामुळे वारंवार बाहेर येणं आणि आत जाणं शक्य नव्हतं. पाण्यात प्रकाशही नव्हता आणि ऑक्सिजन मास्कच्या मदतीने श्वास घ्यायचा होता, जे आव्हानात्मक होतं. अंधार असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं, असंही दिशा पटानीने सांगितलं.
दरम्यान, पाण्यात क्लोरिन असल्यामुळे आपण डोळेही उघडू शकलो नाही, असं आदित्य म्हणाला. ‘वारंवार श्वास घेण्यात अडथळा येत होता, पण सहाय्यक मदत करत होते. समुद्रात ड्रायविंग करणाऱ्या ड्रायवर्ससाठी हे सोपं होतं. पण एक दिवसासाठी आम्ही गेलो असल्यामुळे आमच्यासाठी हे आव्हानात्मक होतं. आव्हानात्मक असलं तरी हे काम उत्साहपूर्ण होतं आणि काही तरी नवीन करायला मिळालं’, असं आदित्य म्हणाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times